Marathi Jokes

भिकारी = साहेब ३० रु द्याना चहा प्यायचा आहे.

भाऊ = काय रे चहा तर १२ रु मिळतो. 

भिकारी = साहेब गर्लफ्रेंडला प्यायचाय ना 

भाऊ = अरे वा भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय 

भिकारी = नाही साहेब गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय 

**********

गन्या = भावा तू तुझ्या रागवलेल्या गर्लफ्रेंडला मनवायला गेला

         होतास ना मग तिचा मार खाऊन कसंकाय आलास ?

मन्या = काय सांगू राव ती मला पाहुन एवढी रडली कि

          तिच्या नाकातून येणारे शेंबडाचे फुगे पाहुन

      मला लय हसायला आल 

**********
बंडया दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो. 

गाडीत बसलो आणि घरी फोन करून सांगतो. 

मला घरी यायला वेळ लागेल. 

गाडीचे स्टेअरिंग गिअर कल्च सगळे चोरीला गेले आहे. 

१० मिनिटांनी परत फोने करतो आणि सांगतो. 

सगळे सापडले. 
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो. 

**********
आई = काय करतोस रे कारट्या ?

मुलगा = वाचन करतोय आई

आई = काय वाचतोय बाळा ?

मुलगा = तुझ्या सुनबाईचे मेसेज
.
.
.
.
आईने १४० च्या स्पीडने चप्प्ल फेकून मारली
तोंडचे फुटल पोराच

**********

स्वारगेट वर मुंबई ची मुलगी

आपल्या कॉलेज स्टायईल मध्ये

तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते,

" हे डबडं केव्हा हलणार इथून" ?
.
.
.
.
कंडक्टर (अदबीने, सस्मित )

"कचरा भरल्यानंतर लगेच"

पुणेरीपणा रक्तातच असतो.

उसना आणता येत नाही.

**********

वाघ वाघीणीला किस करायला लागला.
वाघीनीने वाघाला थांबवले. आणि ईकडे तिकडे पाहिले
.
.
.
.
वाघिण = काय नाही ओ . मी बघतेय कि.
ईथे अस-पास "डिस्कवरी चेनल" वाले तर नाहियेत ना ?
.
.
हरामखोर T. V. ला दाखवतात. 

**********

मास्तर ;- (पप्पूला) या राजे खूप दिवसांनी शाळेत...?

पुणेरी पप्पू :- (डोक्याला हात लावून) आयला ह्या पोकेमॉन गोच्या नादात पुन्हा शाळेत आलो राव...!

**********

बायको नवर्याला कॉल करते आणि म्हणते "आहो कुठे पोहोचलात आज माझी आई आलीये तुम्ही लवकर येतो म्हणालेलात  ना...!

नवरा :- " अंग कल्याण यायला अजून दीड तास लागेल आत्ताच लोकल मिळालीय दादर हुन आरामात बसून येतो"

बायको :- "लोकल मिळाली का ? आता कुठे पोहोचलात तुम्ही ?"

नवरा :- "माटुंग्याला"

इतक्यात लोकल मध्ये घोषणा होते. 
पुढील स्टेशन डोंबिवली, अगला स्टेशन डोंबिवली, Next Station Dombivali 

बायको कडाडते :- " घरी या, तुमचा माटुंगा काढते"

**********

ज्यादिवशी आपल्या girlfrend ची entry होईल...!

सर्वात अधी माझ्या हातून चार, पाच कानाखाली खाईल...!

वेडी इतक्या late कुठे entry मारतात होय...!

**********

सुख पाहिजेल असेल तर रात्री जागू नका...!

शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका...!

सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका...!

आणि आयुष्य आनंदात जागायच असेल तर ह्या पेजला लाईक केल्याशिवाय राहू नका कारण ...! 

"आमची शाखा कुठेही नाही"

**********

आजून वेळ गेलेली नाही,

१० दिवस शिल्लक आहेत. 

सर्व आरत्या एकदा डोळ्यासमोरून घालवा,

नाहीतर दर वर्षी प्रमाणे आरती सुरु झाली कि एकमेकांच्या तोंडावर बघत बसाल...!

**********

गुजरात :- आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीचे ताट असतात. 

राजस्थान :- आमच्याकडे सोन्याची...!

महाराष्ट्र :- आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात...!

"पत्रावळी"

महाराष्ट्रचा नादच खुळा...!

**********

निराश नाही झालो कारण 

जीवनात अजूनही होप आहे 

डोळे अजूनही शोधतात त्या हरामखोराला ज्याने सांगितले होते माज्याकडे कांद्याचे रोप आहे ...!

भाव लाव कांदा...!

**********

मुंबईकर :- तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो. 

पुणेकर :- दीड दिवस...!

मुंबईकर :- किती हा चिकटपणा ??

पुणेकर :- तुमच्याकडे किती दिवस बसतो ??

मुंबईकर :- दहा दिवस 

पुणेकर ;- गणपती कशाची देवता आहे ??

मुंबईकर :- बुद्धीची !!!

पुणेकर :- मग बरोबर आहे. आम्हाला दिड दिवस पुरतो...!

**********

डॉक्टर :- आता तुम्ही अपघातातून बरे जाले आहात.

पेशंट :- ज्या ट्रकने माझा अपघात झाला होता त्याच्या मागे लिहिल होत "फिर मिलेंगे"

**********

अमेरिकन :- आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.
तुमच्याकडे काय पद्धत आहे ?

भारतीय :- तास काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून काशी करेल त्याच्यावर आहे.

**********

मुलीच्या प्रेमात बरबाद झालेल्या मुलाला त्याचे मित्र सुधारू शकतात...!

पण

मित्रांच्या संगतीने बिघडलेल्या पोराला त्याचा बाप पण सुधारूशकत नाही...!

**********

कर्मचारी ;- सर हा शर्ट खूप छान दिसतो तुम्हाला...!

बॉस :- तरीही तुला गणपतीला सुट्टी मिळणार नाही...!

कर्मचारी ;- फक्त शर्टच छान दिसतो, तोंड तसंच आहे फॅन्ड्रीतल्या जब्या सारखं ...!

**********

मुलगी : जानू अशीक बनाया आपने

आता तू का येत नाही सामने ... !

मुलगा : काय अशीक बनाया आपने

दो दिन फिरा तेरे साथ मे

तो कंबर मोडा ना बाप ने ...!

**********





















No comments:

Post a Comment